मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Dil Dadakane do

दिल धडकने दो वन लाईन स्टोरी फॅमिली मॅटर. तर एक उच्चभ्रू कुटुंब मेहरा. नवरा बायको नि त्यांची दोन मुलं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या. प्रत्येकांच वेगळंच गाणं चाललय. कुणी (आनिल कपूर) बिझनेस मध्ये लयाला जाताना स्व: टिकवण्याच्या तयारीत तर कोणी (प्रियंका चोपडा) बिझनेस मधे नाव कमावून स्वः अजूनही हरवलेलाच, सुखाचं आयुष्यही शोषिता प्रमाणे जगणारी (शेफाली शहा), स्वः शोधावा अशी वेळच न आलेला (रणवीर सिंग), पुरोगामी असण्याची झूल मिरवणारा जावई (राहूल बोस), प्रक्टिकल (फरहान अख्तर), अजून एक प्रक्टिकल (अनुश्का शर्मा) ह्या सगळ्यांचा जीवनाचा कोलाज व्यवस्थितपणे आपल्या समोर येतो. हिन्दी सिनेमा वेगळ्या वळणावर जाऊ पहातोय त्यांची एक (पुसटशी का होईना) झलक ह्यात दिसते. आता पर्यंत हिरो हिरोईन यांची प्रेम प्रकरणं, त्रिकोण - चौकोण नुकतिच कुठे याची पुढची पायरी म्हणून लग्नानंतरचं आयुष्य इथवर गाडी आलेली तर ह्यात ती अजून पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तो नक्कीच कौतुकास्पद आहे. संपूर्ण पणे पांढर किंवा काळं असं काही नसतं ना आयुष्य... प्रत्येकांत ग्रे शेड्स असतातच ना... ह्या ग्रे शेड्स खुबीने दा