मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मराठी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बाबू बैन्ड बाजा

बाबू बैन्ड बाजा पहिलाच सीन प्रेतयात्रा ... विर्दभातील प्रथेनुसार वाजवत नेतात. वाजवणारे दोघे बाप नि मुलगा....प्रेत स्मशानात पोहचतं..... मुलगा वडिलांना विचारतो..... मी जाऊ का? कोठे जातो तर थेट शाळेत. ह्यांच नाव बाब्या ....... ज्याच्या वडिलांना वाटतं की यानेही त्यांच्यासाऱखंच वा़जंत्री व्हावं.......एक बाई घरोघरी फिरुन वापरलेल्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी विकतेय....... ही बाब्याची आई......तीला वाटतं याने खूप शिकून मास्तर व्हावं. बाब्यासुद्धा बाब्ची आजी जी दिवसभर बसून झाडू बनवते ती याने शाळेत जावं विचारांची.

स्वराज्य

स्वराज्य घडविताना छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले ... तशाच काहिश्या प्रसंगातून आजच्या युगातील राम पाठारे ही व्यक्तिरेखा प्रवास करते. राम पाठारे हा लोन मागण्यासाठी बॆंकेत जातो. तेथे बॆंकेचा गुजराथी मैनेजर मराठी माणसाने लोन घेऊन, धंदा करून, काय काय भोगलय याचा पाढा वाचतो. त्याला राम अतिशय फिल्मी पद्धतीने जी उत्तरं देतो. तेथेच सुजाण प्रेक्षक समजून जातो कि एक चांगला विषय आपण अतिशय फिल्मी ढंगात पाहणार आहोत. तर हेच संवाद सिंगल स्क्रिन थियेटर मध्ये टाळ्या मिळवताना दिसतात.

देऊळ...ज्याला देव हवा आहे, त्याने तो आपापला शोधावा

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात असणारी बारीक रेष दिवसेनदिवस अधिकच धुसर होत चालली आहे. भॊतिकसुखांसाठी आसुसलेला समाज, त्यात न संपणारी स्पर्धा यात थकून जाऊन मनुष्य आध्यात्मिकतेकडे ओढला जाउ लागला.  ज्या गोष्टीला ग्राहक वर्ग त्या गोष्टीचे बाजारीकरण नसते झाले तर नवलच म्हणावे लागले असते. यातूनच पुढे देवदेवता नि त्यांची ठाणी ह्या बाजारीकरणाच्या विळख्यात पुर्णपणे अडकली. आज नवनवीन तयार होणारी श्रद्धास्थानं नि त्या ठिकाणी मांडलेला बाजार ह्याचे समर्पक चित्रण लेखक गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी प्रेक्षकापर्यंत उत्तमरित्या पोहचवतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर उपहासात्मक टिपण्णी करतानाच, जागतिकीकरणाच्या उठलेल्या वादळात भरकटलेले गाव-खेड्यातील जीवन, शहरीकरण नि चंगळवाद यासाठी झपाटलेली खेड्यातील तरुणाई ....... याची चांगलीच फोडणीही चित्रपटाला दिली आहे.