मुख्य सामग्रीवर वगळा

बाबू बैन्ड बाजा

बाबू बैन्ड बाजा
पहिलाच सीन प्रेतयात्रा ... विर्दभातील प्रथेनुसार वाजवत नेतात. वाजवणारे दोघे बाप नि मुलगा....प्रेत स्मशानात पोहचतं..... मुलगा वडिलांना विचारतो..... मी जाऊ का? कोठे जातो तर थेट शाळेत. ह्यांच नाव बाब्या ....... ज्याच्या वडिलांना वाटतं की यानेही त्यांच्यासाऱखंच वा़जंत्री व्हावं.......एक बाई घरोघरी फिरुन वापरलेल्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी विकतेय....... ही बाब्याची आई......तीला वाटतं याने खूप शिकून मास्तर व्हावं. बाब्यासुद्धा बाब्ची आजी जी दिवसभर बसून झाडू बनवते ती याने शाळेत जावं विचारांची.

पण विचार आणि परिस्थिती यात ताळमेळ कसा बसणार. दोन वेळ जेवायला महाग. त्यात ज्या लाडक्या पोराच्या नावाने बाबू बैन्ड बाजा चालू केलेला त्या बैन्ड ची सर्व बासनं (वाद्य) सावकाराकडे गहान. मग त्या बापालाही वाटतं की पोराने लवकरच दोन पॅसे कमवायला सुरुवात केलेलीच बरी. पण बाब्याची आई मात्र बाब्याला मास्तर करण्यासाठी झपाटून काम काम नि काम करत राहते.

बाब्याला शाळेचा ड्रेस ह्या ना पुढच्या मजुरीवर घ्यायचाच हा आईचा आट्टहास तर बाप त्याला बैन्डची शान म्हणून झगमगित ड्रेस शिवायच्या विवंचनेत..... इथं ड्रेसच्या कपड्याची पंचाईत. तिथं निरागस बाब्या दप्तर हरवतो....... झालं ...... वह्या पुस्तकं सगळचं गेलं...... (दप्तर हरवल्या नंतर ......... आता बाप कुत्र्यासारखं तुडवणार ....... ह्या संवादात बाब्याचे हावभाव अप्रतिम!!! .... ती भिती तो निरागसपणा)
कशीबशी (शाळेच्या ड्रेसच्या) चड्डी ची सोय होते. त्यात आता वह्या ...पुस्तक .....द्प्तर. आई आगतिक होऊन जाते पण बाब्या शाळेत गेलाच पाहिजे म्हणून जिद्दीने काम करतच राह्ते.

काय होतं मिळत का बाब्या दप्तर ?
आता परिस्थिती बदलणार म्हणता विचित्र वळणं येतात का, कशी?
बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकांची किंमत किती मोठी आहे?......... हे अनुभवायचं असेल तर हा सिनेमा बघाचं.
कलाकार तर आहेतच सिनेमा मध्ये पण दारिद्र्य ह्या घटकानेही मोठा रोल साकारला आहे.

वेशभुषा अप्रतिम ........ पटकथा त्यातील धक्के तीची गुंफन अतिसुरेख........पटकथा खरचंच खूप छान फुलवली आहे. गाव त्यातील माणसं राजकारणी मास्तर मान्यवर नि जातपात सगळचं परिणाम कारक रित्या चित्रित झालं आहे.........ईतर पात्र नि त्याचा परिणाम याचाही ताळमेळ छानच..... सर्वच कलाकारांनी सुंदर अभिनय केला आहे. बोहरीण बनून पाटी डोक्यावर बैलेन्स करत चालणं, वाद्य वाजवतानाचं एकंदर शरिराची हालचाल नि भाव आतिशय मेहनत लागली असणार ह्या सगळ्यासाठी. मला मात्र बाब्या आवडला.
आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तिथंच ह्या सारख्या घटना वारंवार घडताहेत हे मात्र जिव्हारी लागतयं.

सिनेमाच्या बाहेरचं..........
मी व माझा मित्र दोघांनीच सिनेमा पाहिला आहे?........बिग सिनेमा....... तिकिट मागितल्यावर पोरगा फोन करायला गेला..... मला वाटलं ऊशिर झाला कि काय ३.१० झाले होते....... पण त्याने तिकिट दिल्या ....... आम्ही स्क्रिन शोधली .....आत गेलो फक्त दोघेच होतो......... कोणी़ फिरकलं नाही!
तीन राष्ट्रीय पारितोषिकं, इंदिरा गांधी ऑवार्ड, पुणे ईन्टरनैशनल फिल्म फेस्टिवल सगळीकडे गॉरव झालेला सिनेमा फक्त नि फक्त स्टार व्हल्यु नसल्याने रिकामं थियटर ..........हे ही जिव्हारी लागतयं.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Tanu Weds Manu Return

तनु वेड्स मनु रिटर्न सध्या जुनंच भांडवल वापरुन नव्याने नफा कमविण्याचा उद्योग चालू आहे. "सेकडं पार्ट" हा हॉलीवूडचा यशस्वी फॉर्म्युला हिन्दी फिल्म इंडस्ट्रीचा नवा ट्रेन्ड आहे. हिन्दीत म्हण आहे "सब्र का फल मीठा होता है." त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे "सेकडं पार्ट"च्या नावाने अनेकानेक अत्याचार सहन केल्यावर रसिक प्रेक्षकांना एक उत्तम कलाविष्कार पहायला मिळाला तो म्हणजे तनु वेड्स मनु रिटर्न. "सेकडं पार्ट"ची जमेची बाजू १) -  ब्रॅन्ड सेट झालेला असतो, नव्याने मार्केटींग करण्याची कसरत तुलनेने थोडी कमी करावी लागते. फिल्ममेकर्स ह्या गोष्टीचा पुरेपुर फायदा घेत, थातुरमातुर मुलामा चढवलेली जुनीच गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचे उद्योग करताना सध्या दिसून येत आहेत. "सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २)  - सिनेमा हे कथा सांगण्याच एक माध्यम आहे, ज्यात प्रात्र उभी करावी लागतात त्यांच कथेतील वागणं जस्टीफाय होण्याकरता त्या पात्राचे स्वभावविषेश, पार्श्वभूमी ह्यात सिनेमाचा जो वेळ जातो नेमका तोच वेळ ह्या"सेकडं पार्ट" मध्ये शिल्लकीत असतो. त्याचा फायदा ...

Khwada ख्वाडा

आज पर्यंत असंख्य सिनेमातून समोर दिसलेली गोष्ट, एक कुटुंब... खत्रुड बाप, कष्टमय आई, भाऊ.. वहिनी.. त्यात एक हिरो त्याचं लग्नाचं वय, त्यात एक हिरोईन, रोमान्टिक स्वप्न. जर हेच सगळं आहे तर हा सिनेमा एवढा गौरवला का गेला? भारतीय सिनेमाची सुरुवातच मुळी परीकथाचं चलचित्र रुप म्हणून झाली. मनोरंजनाचं साधनं म्हणून ते योग्यच होतं. पुढे हे केवळ मनोरंजनाचं साधन न राहता एक समाजमाध्यम म्हणून नावारुपाला आलं, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब,  गुंड, सदगृहस्थ, शहरी, ग्रामीण, त्यात समाजातील सर्वांचीच योग्य दखल घेण्याचा प्रयत्न झाला. तो प्रशंसनीय असला तरीही अपूर्ण होता कारण त्यात त्रयस्थाच्या दृष्टीने आपण ती कहानी पहाणं होत होतं. थोडक्यात एका स्त्रीच्या प्रसुती-कळांच्या वेदना पुरुषाने शब्दबद्ध कराव्यात. भाऊराव कर्‍हाडे दिग्दर्शित ख्वाडा बघताना हे क्षणोक्षणी जाणवतं... सर्वकाही किती अस्सलं आहे. असं राकट, गावरान ह्या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा भाऊराव त्याच मातीतला असणं हे महत्वाचं... तरीही ख्वाडा फक्त त्याच मातीतल्या प्रेक्षकांना भावतो असं मात्र नाही स्टोरीचा प्लॉटच वैश्विक आहे. ख्वाडाला सर्वांना...