मुख्य सामग्रीवर वगळा

Tanu Weds Manu Return


तनु वेड्स मनु रिटर्न



सध्या जुनंच भांडवल वापरुन नव्याने नफा कमविण्याचा उद्योग चालू आहे. "सेकडं पार्ट" हा हॉलीवूडचा यशस्वी फॉर्म्युला हिन्दी फिल्म इंडस्ट्रीचा नवा ट्रेन्ड आहे. हिन्दीत म्हण आहे "सब्र का फल मीठा होता है." त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे "सेकडं पार्ट"च्या नावाने अनेकानेक अत्याचार सहन केल्यावर रसिक प्रेक्षकांना एक उत्तम कलाविष्कार पहायला मिळाला तो म्हणजे तनु वेड्स मनु रिटर्न.

"सेकडं पार्ट"ची जमेची बाजू १) -  ब्रॅन्ड सेट झालेला असतो, नव्याने मार्केटींग करण्याची कसरत तुलनेने थोडी कमी करावी लागते. फिल्ममेकर्स ह्या गोष्टीचा पुरेपुर फायदा घेत, थातुरमातुर मुलामा चढवलेली जुनीच गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचे उद्योग करताना सध्या दिसून येत आहेत.
"सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २)  - सिनेमा हे कथा सांगण्याच एक माध्यम आहे, ज्यात प्रात्र उभी करावी लागतात त्यांच कथेतील वागणं जस्टीफाय होण्याकरता त्या पात्राचे स्वभावविषेश, पार्श्वभूमी ह्यात सिनेमाचा जो वेळ जातो नेमका तोच वेळ ह्या"सेकडं पार्ट" मध्ये शिल्लकीत असतो. त्याचा फायदा उचलून उत्तम कथानक देण्याच्या भानगडीत कोणी फिल्ममेकर्सच्या नाही आहे.

अश्यातच आनंद एल राज नावाचा कोणी अवलिया तनु वेड्स मनु रिटर्न घेऊन येतो. "सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २) चा पुरेपुर फायदा उचलत एक अत्यंत वेगवान नि दर्जेदार कथानक आपल्याला पाहायला मिळंत. जिथे ज्या लग्नसमारंभात सिनेमा चार वर्षापूर्वी संपलेला अगदी त्या तिथूनच रिटर्न्स सुरु होतो. मोठ्यामेहनतीने अरेन्ज मॅरेजच रुपांतर लव्ह मॅरेज मध्ये करुन तनु-मनु हॅप्पी एन्डिग नोट वर संपलेल्या सिनेमाचे हिरोईन-हिरो. पुढची जेमतेम चार वर्ष संसाराची सहन करुन (लंडन मध्ये) पुन्हा भारतात परतात. त्यांच्या ह्या नव्या भारत सफारीने धमाल उडवून दिली आहे. हिरोईन-हिरोच नाही तर इतर सर्वच पात्र आयुष्याच्या ज्या वळणावर उभे आहेत तेथे त्यांनी घेतलेले निर्णय, त्याचे परिणाम हे अप्रतिमरित्या उतरलेत. सिनेमाचा वास्तव जिवनाशी काही संबंध नसतो ह्या ही रुढीला पूर्ण फाटा देत प्रत्येक पात्र समोर येतं ते आपलं वाटू लागतं. व्हॉट्स अप वर कमेन्ट्चा चूकीचा अर्थ काढून पप्पीभैया घोड्चूक करुन बसतो. मनुला त्याचे वडील डायवोर्स पासून परावृत्त करण्याच्या मागे असताना स्व:त मात्र बायकोच्या कटकटीने वैतागून संयम गमावून बसतात, चारदा दीदी म्हणून झाल्यावरही तनुच्या प्रेमात पडणारा भाडेकरु, सगळ्यांचा स्वभाव काळाशी सुसंगत असल्याने आपल्याला सिनेमाशी रिलेट करणं सोप होऊन जातं. आणि हो कानपूर, पंजाब चे बारकावे मागील भागात ज्यासुंदर रितीने टिपलेले त्याचं नेक्स्ट व्हर्जन म्हणजे हरियाणा.

हिरो-हिरोईन हा प्रचलित शब्द सोडून हिरोईन-हिरो लिहण्याची दोन कारणे १) - संपूर्ण कथेत वरचढ असणारी तनु.
२) - तनु म्हणुन असणारी कंगणा, ह्या ही वर्षीचा नॅशनल अ‍ॅवार्ड मिळण्याची पुरेपुर संधी. संधी जी कंगणाने अतिशय महेनतीने निर्माण केली आहे. मिळालेल्या उत्तम भुमिकेचं तिने आपल्या अप्रतिम अभिनयाने खरचं सोनं केलं. रस्त्याने सहजच फिरताना समोरुन चाललेल्या लग्नाच्या मिरवणूकित मनसोक्त नि बिनधास्तपणे नाचून वरवर जरी जूनी तनु नि तिचा बिनधास्तपणाचा आव आणताना मात्र काळाच्या ओघात हळवी झालेली तनु निव्वळ अप्रतिम.  हरियाणवी टोन, अ‍ॅथलिटचा पुरुषी ढंग मिथुनदा च्या भाषेत क्या बात! क्या बात!! क्या बात!!!

सशक्त, वेगवान पटकथा सिनेमाच्या इतर तांत्रिक बाबींकडे पहायला वेळच देत नाही. एडिटिंग जबरदस्त, लोकेशन्स्, कॉस्च्युम डि़झाइनिंग रोचक आहेतच पण डबल रोल कसा असावा नि तो कसा निभवावा याचे नवीन आयाम उभे केलेत. कथा, पटकथा, संवाद नि व्यक्तिरेखा सर्वच बाबींत हा चित्रपट मैलाचा दगड ठरला आहे. आनंद एल राज हे नाव पुरेसं असणार आहे पुढील चित्रपट पाहण्यासाठी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Fandry फँड्री

फँड्री सिनेमा खूपच छान आहे अजूनही पाहिला नसेल तर हे वाचण्यापूर्वीच पाहून या! फँड्री ... जाहिरात पाहिली ती "टाईमपास" मध्ये.. एक लव्हस्टोरी समोर पडद्यावर चालू होतीच अजून एक येणार हेच प्रथमदर्शी जाणवलं. नंतर जेव्हा सहजच नागराज मंजुळेंच्या फेसबुक वॉल वर डोकावलं... तेथेही काहीजण त्याच कुतुहलाने गेले होते कि फँड्री ह्या शब्दांचा अर्थ काय? कदाचित नागराजला हे माहित असावं... त्यांनी लिहून ठेवलं होतं, आपण फँड्री म्हणजे काय हे शोधत याल तेव्हा आपल्याला या उपेक्षित-दुर्लक्षित माणसांच्या अस्तिवाची, त्यांच्या वेदनांची जाणीव झाली तर "फँड्री" चा तुमचा शोध व मी बाळगलेले गुपित दोन्हीही फलद्रूप झाले असे म्हणता येईल. हे वाचूनच जाणवलं की ही फक्त लव्हस्टोरी नक्कीच नसेल. पुढे सिनेमा पाहिल्यावर वरील वाक्याचे सार गवसले. सिनेमा जब्याची कथा घेऊन येतो. त्यांच घर, कुटुंब, मित्र, प्रेमप्रकरण नि मुख्य म्हणजे गाव (समाज). हो हा समाजच मुख्य भुमिकेत आहे. अल्लड वयात असणार्‍या जब्याला एक मुलगी आवडते. तिला आपण आवडणारच नाही ह्या भितीने चंक्याच्या नादी लागून ह्याचे भलतेच(अयोग्य) उपद्द्व्याप चालू

परजीवी असुरन #parasite #asuran

एकाच आठवडयात दोन वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पहिले. दोन्ही त्या त्या मूळ भाषेतच उपलब्ध आहेत. डब करून डबा झाले नाहीत, हि जमेची बाजू. मुळात भाषेचा तितकासा अडथळा जाणवतच नाही. पहिला असुरन आणि दुसरा पॅरासाईट. एकाच वैश्र्विक पातळीवर वारेमाप कौतुक तर दुसऱ्याच मात्र राष्ट्रीय पातळीवरही तितकंसं कौतुक नाही. तिळमात्र उणीवांसह दोन्ही चित्रपट म्हणून खूप समृद्ध अनुभव देऊन जातात. दोन्ही सिनेमांच्या मुख्य कथेचे बाह्यरंग निश्चितच वेगळे वाटू शकतात पण अंतरंगात शिरल्यावर मात्र अनेक साम्यस्थळं खुणावू लागतात. एक कथा शहरात घडते (#पॅरासाईट) तर दुसरी कथा गावात (#असुरन). एका कथेचा कालखंड अगदी थोडका काही महिने ते उणेपुरे एक वर्ष . दुसऱ्या कथेचा कालखंड हा जवळजवळ दोन पिढयांचा. एका कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला पिझ्झा बॉक्स (प्रिन्टिंग, कोरिगेशन नि व्यवस्थित क्रिझीग केलेला) फक्त फोल्ड करण्यासाठी #youtube ची नितांत आवश्यकता भासते, दुसऱ्या कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला बाँम्ब बनविण्यातही तितकीशी अडचण येत नाही. नायकाचं नायकपण सिद्ध करणं हि स्थानिक गरज असुरन ला वाटते ती मात्र पॅरासा