मुख्य सामग्रीवर वगळा

स्वराज्य

स्वराज्य घडविताना छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले ... तशाच काहिश्या प्रसंगातून आजच्या युगातील राम पाठारे ही व्यक्तिरेखा प्रवास करते.


राम पाठारे हा लोन मागण्यासाठी बॆंकेत जातो. तेथे बॆंकेचा गुजराथी मैनेजर मराठी माणसाने लोन घेऊन, धंदा करून, काय काय भोगलय याचा पाढा वाचतो. त्याला राम अतिशय फिल्मी पद्धतीने जी उत्तरं देतो. तेथेच सुजाण प्रेक्षक समजून जातो कि एक चांगला विषय आपण अतिशय फिल्मी ढंगात पाहणार आहोत. तर हेच संवाद सिंगल स्क्रिन थियेटर मध्ये टाळ्या मिळवताना दिसतात.

पुढे पावलोपावली इतर प्रांतियाकडून मराठी माणसावर होणारे अन्याय बघून राम अस्वस्थ होत जातो. कम्युटर मध्ये काही बि़झनेस करायलेला निघालेला राम आईच्या सांगण्यावरुन .... आपल्याच चाळीतील माणसांना बरोबर घेऊन फूड इंडस्र्टीत जम बसवतो. आता स्वामी त्याच्यावर त्याहून मोठी जबाबदारी सोपावतात. ती म्हणजे ह्या कोणीही वाली उरलेला नाही अशा मराठी समाजाच्या उत्कर्षाची. त्यासाठी रामला राजकारणात उतरावेच लागते.

स्वराज्याची वाटचालीत शिवाजी महाराजां प्रमाणेच राम सुद्धा मुस्लिमांनाही बरोबर घेणे, पण त्याच बरोबार अफजलखानाचा खात्मा, बाजीप्रभूने खिंड लढविणे, शाहिस्तेखानाची बोटे कापणे ह्या गोष्टी करताना पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात सरदार मोरेंनी केलेली फितुरी ईथेही घडते मात्र इतिहास बदलला जातो का?  राम पाठारे आमदारकीची निवडणुक लढवतो, त्यात तो विजयी होतो का? ह्या संपूर्ण प्रवासात येणारी विघ्न जिवावर बेतणारे प्रसंग यातून राम सुखरुप राह्तो का? त्याला साथ देणार्‍या मावळ्यांचे काय होते? हे सिनेमा बघितल्यावर कळेलच.

फसलेल्या गोष्टी :
स्वराज्याच्या उभारणीत महाराजांना सामना करावा लागलेल्या गोष्टी... सिनेमाच्या कथानकात चपलखपणे बसविण्यात लेखक / दिग्दर्शक अयशस्वी ठरतो.

कथेला वेग आणण्याच्या धडपडीत समोर उभं राहिलेलं विश्व हे तितकसं विश्वसनिय ठरत नाही.

(ह्या पूर्वीच येऊन गेलेल्या रंग दे बंसतीची आठवण हमखास होते... त्यातही इतिहास नि वर्तमान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला गेला होता... पण त्या कथानकाने फिल्मी न होता वास्तवाशी जवळिक साधल्याने विश्वसनिय झाले आणि त्या सिनेमाला अभूतपूर्व यश लाभले... ईथे मात्र स्वराज्य कमी पडते.)

बहारदार गोष्टी :
आजपर्यंत मराठी सिनेमात कधिही न बघितलेली बलाढ्य माणसे. हिरो, साईड हिरो, व्हिलन सगळेच पिळदार शरीरयष्ठीचे...

सुंदर फ्रेम्स् ... छानसं म्युजिक ... वास्तवाशी फारकत घेतलेली असली तरीही सुंदर वेशभुषा.

राजेश श्रुगांरपुरेने साकारलेला रुबाबदार नि दमदार मर्द मराठा.

हे खरचं मराठी सिनेमासाठी दुर्मिळ आहे. म्हणुनच हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बाबू बैन्ड बाजा

बाबू बैन्ड बाजा पहिलाच सीन प्रेतयात्रा ... विर्दभातील प्रथेनुसार वाजवत नेतात. वाजवणारे दोघे बाप नि मुलगा....प्रेत स्मशानात पोहचतं..... मुलगा वडिलांना विचारतो..... मी जाऊ का? कोठे जातो तर थेट शाळेत. ह्यांच नाव बाब्या ....... ज्याच्या वडिलांना वाटतं की यानेही त्यांच्यासाऱखंच वा़जंत्री व्हावं.......एक बाई घरोघरी फिरुन वापरलेल्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी विकतेय....... ही बाब्याची आई......तीला वाटतं याने खूप शिकून मास्तर व्हावं. बाब्यासुद्धा बाब्ची आजी जी दिवसभर बसून झाडू बनवते ती याने शाळेत जावं विचारांची.

Khwada ख्वाडा

आज पर्यंत असंख्य सिनेमातून समोर दिसलेली गोष्ट, एक कुटुंब... खत्रुड बाप, कष्टमय आई, भाऊ.. वहिनी.. त्यात एक हिरो त्याचं लग्नाचं वय, त्यात एक हिरोईन, रोमान्टिक स्वप्न. जर हेच सगळं आहे तर हा सिनेमा एवढा गौरवला का गेला? भारतीय सिनेमाची सुरुवातच मुळी परीकथाचं चलचित्र रुप म्हणून झाली. मनोरंजनाचं साधनं म्हणून ते योग्यच होतं. पुढे हे केवळ मनोरंजनाचं साधन न राहता एक समाजमाध्यम म्हणून नावारुपाला आलं, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब,  गुंड, सदगृहस्थ, शहरी, ग्रामीण, त्यात समाजातील सर्वांचीच योग्य दखल घेण्याचा प्रयत्न झाला. तो प्रशंसनीय असला तरीही अपूर्ण होता कारण त्यात त्रयस्थाच्या दृष्टीने आपण ती कहानी पहाणं होत होतं. थोडक्यात एका स्त्रीच्या प्रसुती-कळांच्या वेदना पुरुषाने शब्दबद्ध कराव्यात. भाऊराव कर्‍हाडे दिग्दर्शित ख्वाडा बघताना हे क्षणोक्षणी जाणवतं... सर्वकाही किती अस्सलं आहे. असं राकट, गावरान ह्या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा भाऊराव त्याच मातीतला असणं हे महत्वाचं... तरीही ख्वाडा फक्त त्याच मातीतल्या प्रेक्षकांना भावतो असं मात्र नाही स्टोरीचा प्लॉटच वैश्विक आहे. ख्वाडाला सर्वांना...

सैराट... Sairat

हलका आहार... नि  जड आहार... सैराट पचायला थोडा जड गेला... जवळ-जवळ चार-एक दिवस गेले. दो दो शक़्लें दिखती हैं इस बहके से आईने में मेरे साथ चला आया है आपका इक सौदाई भी ख़ामोशी का हासिल भी इक लम्बी सी ख़ामोशी है उन की बात सुनी भी हमने अपनी बात सुनाई भी... हे नागराजंच १४ एप्रिलचं पोस्ट... हेच सैराट सिनेमात उतरलं आहे. नागराज ने पिटातल्या प्रेक्षकांचही ऐकलंय आणि स्व:तचही सांगितलं आहे. सिनेमा बनविण्याची व पाहण्याची कला ढोबळ पध्दतीने दोन प्रकारात विभागला गेली, कर्मशिअल आणि आर्ट. नंतर बर्याच कालावधी पर्यंत प्रेक्षकही ह्या अलिखित पध्दतित विभागले गेले. सैराट ने सर्व बांध मोडीत काढत कर्मशिअल आणि आर्ट एकत्र आणलय बघुया सर्वांना आवडतय का... जर हे खरचं सैराट चाललं तर येणार्‍या दिवसांत सिनेमा आणखी सशक्त होईल. फर्स्ट हाफ... एव्हडा सुंदर आहे कि विचारता सोय नाही. हिन्दी सिनेमावाले निर्सगाचं मनोवेधक रुप शोधायला पार स्विजरलैंडला जायचे... पण सैराट तर हॉलिवूडवाली दृष्य मराठीत आणि ते ही महाराष्ट्रातील गाव-खेड्यांतील वेडं लावणारी दृष्य आपल्यासमोर घेऊन येतो. एकाच सिनेमात किती सुंदर गोष्टींचा म...