मुख्य सामग्रीवर वगळा

Dil Dadakane do

दिल धडकने दो




वन लाईन स्टोरी फॅमिली मॅटर. तर एक उच्चभ्रू कुटुंब मेहरा. नवरा बायको नि त्यांची दोन मुलं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या. प्रत्येकांच वेगळंच गाणं चाललय. कुणी (आनिल कपूर) बिझनेस मध्ये लयाला जाताना स्व: टिकवण्याच्या तयारीत तर कोणी (प्रियंका चोपडा) बिझनेस मधे नाव कमावून स्वः अजूनही हरवलेलाच, सुखाचं आयुष्यही शोषिता प्रमाणे जगणारी (शेफाली शहा), स्वः शोधावा अशी वेळच न आलेला (रणवीर सिंग), पुरोगामी असण्याची झूल मिरवणारा जावई (राहूल बोस), प्रक्टिकल (फरहान अख्तर), अजून एक प्रक्टिकल (अनुश्का शर्मा) ह्या सगळ्यांचा जीवनाचा कोलाज व्यवस्थितपणे आपल्या समोर येतो.

हिन्दी सिनेमा वेगळ्या वळणावर जाऊ पहातोय त्यांची एक (पुसटशी का होईना) झलक ह्यात दिसते. आता पर्यंत हिरो हिरोईन यांची प्रेम प्रकरणं, त्रिकोण - चौकोण नुकतिच कुठे याची पुढची पायरी म्हणून लग्नानंतरचं आयुष्य इथवर गाडी आलेली तर ह्यात ती अजून पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तो नक्कीच कौतुकास्पद आहे.

संपूर्ण पणे पांढर किंवा काळं असं काही नसतं ना आयुष्य... प्रत्येकांत ग्रे शेड्स असतातच ना... ह्या ग्रे शेड्स खुबीने दाखवण्याचं काम बर्‍याचदा लो बजेट आर्ट फिल्मस् उत्तम करतात. तेच इथे भव्य दिव्य पणे पूर्ण कर्मशियल सिनेमा करु पाहतो, पण ही रियालिटी नि रियल माणसं काही ह्या कर्मशियल सिनेमाला झेपत नाहीत. शेवटाकडे जाता जाता सगळंच कसं फिल्मी होऊन जातं. संगीत काही जमलं नाही एकही गाणं थियेटर मधून बाहेर पडल्यावर लक्षात राहत नाही. सिनेमॅटोग्राफी ही यथा तथाच. आर्ट/कर्मशियल मिश्रण काही एकजीव होत नाही रिमा काग्ती नि झोया अख्तर द्वयीकडून जे अपेक्षीत असं होतं ते काही गवसतं नाही. एवढं भव्य क्रू़झ नि त्यातून विदेश पर्यटन पण कुठेच ती भव्यता टिपली गेली नाही. ज्या व्यक्तिरेखा अस्सल म्हणून बारकाव्यांसहित सुरवातीला उभ्या राहतात... क्षणात फिल्मी पध्दतीने वागू लागतात. ना धड हे ना धड ते.

त्यातूनही काही सीन्स् अगदी जमून आलेत, नाविन्य ही आहेच थोड्सं. अभिनयात तर चढाओढच... त्यातूनही लक्षात राहते प्रियंका... (आयेशा मेहरा) मूलगी असण्याचं मोल प्रत्येक ट्प्प्यावर चुकवणारी त्यातून आलेला समंजसपणा... परिस्थितीशरण राहणं ते तो बुजरेपणा झट्कून स्वतःहा साठी जगणं ह्यात अचानक नि तीव्र बदल न होता तो ज्या हळुवार पणे भुतकाळाशी सुसंगत होतो ... हे अगदी उत्तम साकारलं आहे.

एकूणच भारतीय समाजाचं दुट्प्पीपण व्यवस्थित पणे समोर येतं सिनेमातून. एकदा पहावाचं जरुर... टिकावू नाही आहे पण टाकावू ही नक्कीच नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Tanu Weds Manu Return

तनु वेड्स मनु रिटर्न सध्या जुनंच भांडवल वापरुन नव्याने नफा कमविण्याचा उद्योग चालू आहे. "सेकडं पार्ट" हा हॉलीवूडचा यशस्वी फॉर्म्युला हिन्दी फिल्म इंडस्ट्रीचा नवा ट्रेन्ड आहे. हिन्दीत म्हण आहे "सब्र का फल मीठा होता है." त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे "सेकडं पार्ट"च्या नावाने अनेकानेक अत्याचार सहन केल्यावर रसिक प्रेक्षकांना एक उत्तम कलाविष्कार पहायला मिळाला तो म्हणजे तनु वेड्स मनु रिटर्न. "सेकडं पार्ट"ची जमेची बाजू १) -  ब्रॅन्ड सेट झालेला असतो, नव्याने मार्केटींग करण्याची कसरत तुलनेने थोडी कमी करावी लागते. फिल्ममेकर्स ह्या गोष्टीचा पुरेपुर फायदा घेत, थातुरमातुर मुलामा चढवलेली जुनीच गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचे उद्योग करताना सध्या दिसून येत आहेत. "सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २)  - सिनेमा हे कथा सांगण्याच एक माध्यम आहे, ज्यात प्रात्र उभी करावी लागतात त्यांच कथेतील वागणं जस्टीफाय होण्याकरता त्या पात्राचे स्वभावविषेश, पार्श्वभूमी ह्यात सिनेमाचा जो वेळ जातो नेमका तोच वेळ ह्या"सेकडं पार्ट" मध्ये शिल्लकीत असतो. त्याचा फायदा ...

बाबू बैन्ड बाजा

बाबू बैन्ड बाजा पहिलाच सीन प्रेतयात्रा ... विर्दभातील प्रथेनुसार वाजवत नेतात. वाजवणारे दोघे बाप नि मुलगा....प्रेत स्मशानात पोहचतं..... मुलगा वडिलांना विचारतो..... मी जाऊ का? कोठे जातो तर थेट शाळेत. ह्यांच नाव बाब्या ....... ज्याच्या वडिलांना वाटतं की यानेही त्यांच्यासाऱखंच वा़जंत्री व्हावं.......एक बाई घरोघरी फिरुन वापरलेल्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी विकतेय....... ही बाब्याची आई......तीला वाटतं याने खूप शिकून मास्तर व्हावं. बाब्यासुद्धा बाब्ची आजी जी दिवसभर बसून झाडू बनवते ती याने शाळेत जावं विचारांची.

Khwada ख्वाडा

आज पर्यंत असंख्य सिनेमातून समोर दिसलेली गोष्ट, एक कुटुंब... खत्रुड बाप, कष्टमय आई, भाऊ.. वहिनी.. त्यात एक हिरो त्याचं लग्नाचं वय, त्यात एक हिरोईन, रोमान्टिक स्वप्न. जर हेच सगळं आहे तर हा सिनेमा एवढा गौरवला का गेला? भारतीय सिनेमाची सुरुवातच मुळी परीकथाचं चलचित्र रुप म्हणून झाली. मनोरंजनाचं साधनं म्हणून ते योग्यच होतं. पुढे हे केवळ मनोरंजनाचं साधन न राहता एक समाजमाध्यम म्हणून नावारुपाला आलं, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब,  गुंड, सदगृहस्थ, शहरी, ग्रामीण, त्यात समाजातील सर्वांचीच योग्य दखल घेण्याचा प्रयत्न झाला. तो प्रशंसनीय असला तरीही अपूर्ण होता कारण त्यात त्रयस्थाच्या दृष्टीने आपण ती कहानी पहाणं होत होतं. थोडक्यात एका स्त्रीच्या प्रसुती-कळांच्या वेदना पुरुषाने शब्दबद्ध कराव्यात. भाऊराव कर्‍हाडे दिग्दर्शित ख्वाडा बघताना हे क्षणोक्षणी जाणवतं... सर्वकाही किती अस्सलं आहे. असं राकट, गावरान ह्या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा भाऊराव त्याच मातीतला असणं हे महत्वाचं... तरीही ख्वाडा फक्त त्याच मातीतल्या प्रेक्षकांना भावतो असं मात्र नाही स्टोरीचा प्लॉटच वैश्विक आहे. ख्वाडाला सर्वांना...