एकाच आठवडयात दोन वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पहिले. दोन्ही त्या त्या मूळ भाषेतच उपलब्ध आहेत. डब करून डबा झाले नाहीत, हि जमेची बाजू. मुळात भाषेचा तितकासा अडथळा जाणवतच नाही. पहिला असुरन आणि दुसरा पॅरासाईट. एकाच वैश्र्विक पातळीवर वारेमाप कौतुक तर दुसऱ्याच मात्र राष्ट्रीय पातळीवरही तितकंसं कौतुक नाही. तिळमात्र उणीवांसह दोन्ही चित्रपट म्हणून खूप समृद्ध अनुभव देऊन जातात. दोन्ही सिनेमांच्या मुख्य कथेचे बाह्यरंग निश्चितच वेगळे वाटू शकतात पण अंतरंगात शिरल्यावर मात्र अनेक साम्यस्थळं खुणावू लागतात. एक कथा शहरात घडते (#पॅरासाईट) तर दुसरी कथा गावात (#असुरन). एका कथेचा कालखंड अगदी थोडका काही महिने ते उणेपुरे एक वर्ष . दुसऱ्या कथेचा कालखंड हा जवळजवळ दोन पिढयांचा. एका कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला पिझ्झा बॉक्स (प्रिन्टिंग, कोरिगेशन नि व्यवस्थित क्रिझीग केलेला) फक्त फोल्ड करण्यासाठी #youtube ची नितांत आवश्यकता भासते, दुसऱ्या कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला बाँम्ब बनविण्यातही तितकीशी अडचण येत नाही. नायकाचं नायकपण सिद्ध करणं हि स्थानिक गरज असुरन ला वाटते ती मात्र पॅरासा...
फक्त मराठीच नाही तर इतर भारतीय भाषा आणि एकंदरीत ग्लोबल सिनेमाचा लोकल भाषेत रसास्वाद !!!