मुख्य सामग्रीवर वगळा

परजीवी असुरन #parasite #asuran


एकाच आठवडयात दोन वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पहिले. दोन्ही त्या त्या मूळ भाषेतच उपलब्ध आहेत. डब करून डबा झाले नाहीत, हि जमेची बाजू. मुळात भाषेचा तितकासा अडथळा जाणवतच नाही. पहिला असुरन आणि दुसरा पॅरासाईट. एकाच वैश्र्विक पातळीवर वारेमाप कौतुक तर दुसऱ्याच मात्र राष्ट्रीय पातळीवरही तितकंसं कौतुक नाही. तिळमात्र उणीवांसह दोन्ही चित्रपट म्हणून खूप समृद्ध अनुभव देऊन जातात.

दोन्ही सिनेमांच्या मुख्य कथेचे बाह्यरंग निश्चितच वेगळे वाटू शकतात पण अंतरंगात शिरल्यावर मात्र अनेक साम्यस्थळं खुणावू लागतात. एक कथा शहरात घडते (#पॅरासाईट) तर दुसरी कथा गावात (#असुरन). एका कथेचा कालखंड अगदी थोडका काही महिने ते उणेपुरे एक वर्ष . दुसऱ्या कथेचा कालखंड हा जवळजवळ दोन पिढयांचा. एका कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला पिझ्झा बॉक्स (प्रिन्टिंग, कोरिगेशन नि व्यवस्थित क्रिझीग केलेला) फक्त फोल्ड करण्यासाठी #youtube ची नितांत आवश्यकता भासते, दुसऱ्या कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला बाँम्ब बनविण्यातही तितकीशी अडचण येत नाही.

नायकाचं नायकपण सिद्ध करणं हि स्थानिक गरज असुरन ला वाटते ती मात्र पॅरासाईटला वाटत नाही. असुरनच्या नायकाने सहनशीलता सोडून पलटवार करणे तेही हिंसेचा मार्ग अवलंबुन हि प्रेक्षक म्हणून गरज बनते, कारण अत्याचारांचा परमोच्च बिंदू आलेला असतो वाटतं तु मार नाहीतर आम्ही मारू त्याला पण पॅरासाईट मध्ये नायकाने हिंसेचा मार्ग स्विकारत चाकूने वार करणे तितकं गरजेचं वाटत नाही. (असुरन) डोक्यावर चप्पल घेऊन गावभर काढलेली धींड पुरेश्या टोकदारपणे अंगावर येत नाही पण (पॅरासाईट) गरिबीचा वास श्रीमंती ज्या पध्द्तीने झिडकारते ते अधिक वेदनादाई होतं.

आता जरा साम्यस्थळांवर येऊ.

सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असं काहीसं घासुन गुळमिळीत झालेलं वाक्य न पटणारी जनता आज खूप जास्त प्रमाणात आहे. बिघडलेला समाज सिनेमांतून चित्रित होत नाही तर सिनेमांतून चित्रित झालेल्या दृश्यानी समाज बिघडतो आहे ह्यावर ठाम विश्वास असणारेच जास्त पॉवर मध्ये आलेले आहेत. ती पॉवर त्यांनी काही वर्षात ठळकपणे दाखवून दिली आहे. तरीही हे दोन्ही चित्रपट मात्र आजच्या त्या समाजाचे दर्शन घडवतात जो समाज कपाळमोक्ष निश्चिंत असणाऱ्या दरीच्या टोकावर उभा आहे.

दोन्ही कथेतील नायक कथेच्या सुरुवातीच्या टप्प्यात हतबल दाखवले आहेत. दोघेही बऱ्याचदा सुस्त, नशेत पेंगळलेले अक्षरश: झोपलेले दिसतात. त्यांची मुलं मात्र परिस्थितीशी दोन हात करण्याची वृत्ती अंगी बाळगुन विविध क्लुप्त्या लढवतात. अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्याची जिद्द मात्र मार्ग चुकविते. मुलं चुकीचा मार्ग का निवडतात? आजची पिढी अशीच आहे. त्यांच्यात पेशन्स नाहीत. त्यांना सगळं कसं झटपट पाहिजे. मग ती श्रीमंती  (#parasite) असो व न्याय (#asuran). हा काहीसा पोकळ विचार झाला, कारण सिनेमा जे मांडतो त्यामुळे अहिंसेच्या समर्थनातून तयार झालेल्या सद्सदविकेक बुद्धीलाही दोन्ही सिनेमांतील हिंसा समर्थनीय वाटते. (एकावर तर ऑस्करनेही शिक्कमोर्तब केलंय ... तोच ऑस्कर जो कोणत्याही वैयक्तिक किंवा सामाजिक समस्यांचं सोपं उत्तर हिंसा असणाऱ्या चित्रपटांना कधीच थारा देत नाही आहे.)

इथं ते घासुन गुळमिळीत झालेलं वाक्य कामाला येत की सिनेमा हा समाजाचा आरसा आहे. स्थानिक, राष्ट्रीय अगदी वैश्विक पातळीवरही तेच चालू आहे. हि परिस्थिती आलेली आहे, येणार आहे, अजून खूप दूर आहे. तुम्ही भर ऊन्हात रस्त्यावरून पायपीट करताय, पेट्रोल वाचविण्याकरिता AC बंद करुन खिडक्या उघड्याकरुन कार चालवताय, कि merc च्या बॅकसीटला बसून हातात ccd ची कॉफी धरून ड्रायव्हरची टेस्ट घेताय यावर अवलंबुन आहे.

सहा महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रांत एक लेख वाचनात आला होता. त्याचा सार साधारण असा होता कि, नामंकीत मानांकन देणाऱ्या संस्थेनं केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील अतिश्रीमंतांना असं वाटतं की त्यांना आणि त्यांच्या श्रीमंतीला मुख्य धोका जागतिक मंदीने होणारी शेअर मार्केट ची घसरण किंवा नैसर्गिक आपत्ती हा नसून गरीब वर्ग हा आहे. पण श्रीमंतांनी इतक्यात घाबरून जाण्याची तितकीशी गरज नाही आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये शेवट हा शिक्षण आणि शिक्षणातून मिळणाऱ्या शाश्वत समृद्धी वर ठाम विश्वास व्यक्त करतो.

संदीप आहेर.
#thesandeepaher

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बाबू बैन्ड बाजा

बाबू बैन्ड बाजा पहिलाच सीन प्रेतयात्रा ... विर्दभातील प्रथेनुसार वाजवत नेतात. वाजवणारे दोघे बाप नि मुलगा....प्रेत स्मशानात पोहचतं..... मुलगा वडिलांना विचारतो..... मी जाऊ का? कोठे जातो तर थेट शाळेत. ह्यांच नाव बाब्या ....... ज्याच्या वडिलांना वाटतं की यानेही त्यांच्यासाऱखंच वा़जंत्री व्हावं.......एक बाई घरोघरी फिरुन वापरलेल्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी विकतेय....... ही बाब्याची आई......तीला वाटतं याने खूप शिकून मास्तर व्हावं. बाब्यासुद्धा बाब्ची आजी जी दिवसभर बसून झाडू बनवते ती याने शाळेत जावं विचारांची.

Khwada ख्वाडा

आज पर्यंत असंख्य सिनेमातून समोर दिसलेली गोष्ट, एक कुटुंब... खत्रुड बाप, कष्टमय आई, भाऊ.. वहिनी.. त्यात एक हिरो त्याचं लग्नाचं वय, त्यात एक हिरोईन, रोमान्टिक स्वप्न. जर हेच सगळं आहे तर हा सिनेमा एवढा गौरवला का गेला? भारतीय सिनेमाची सुरुवातच मुळी परीकथाचं चलचित्र रुप म्हणून झाली. मनोरंजनाचं साधनं म्हणून ते योग्यच होतं. पुढे हे केवळ मनोरंजनाचं साधन न राहता एक समाजमाध्यम म्हणून नावारुपाला आलं, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब,  गुंड, सदगृहस्थ, शहरी, ग्रामीण, त्यात समाजातील सर्वांचीच योग्य दखल घेण्याचा प्रयत्न झाला. तो प्रशंसनीय असला तरीही अपूर्ण होता कारण त्यात त्रयस्थाच्या दृष्टीने आपण ती कहानी पहाणं होत होतं. थोडक्यात एका स्त्रीच्या प्रसुती-कळांच्या वेदना पुरुषाने शब्दबद्ध कराव्यात. भाऊराव कर्‍हाडे दिग्दर्शित ख्वाडा बघताना हे क्षणोक्षणी जाणवतं... सर्वकाही किती अस्सलं आहे. असं राकट, गावरान ह्या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा भाऊराव त्याच मातीतला असणं हे महत्वाचं... तरीही ख्वाडा फक्त त्याच मातीतल्या प्रेक्षकांना भावतो असं मात्र नाही स्टोरीचा प्लॉटच वैश्विक आहे. ख्वाडाला सर्वांना...

सैराट... Sairat

हलका आहार... नि  जड आहार... सैराट पचायला थोडा जड गेला... जवळ-जवळ चार-एक दिवस गेले. दो दो शक़्लें दिखती हैं इस बहके से आईने में मेरे साथ चला आया है आपका इक सौदाई भी ख़ामोशी का हासिल भी इक लम्बी सी ख़ामोशी है उन की बात सुनी भी हमने अपनी बात सुनाई भी... हे नागराजंच १४ एप्रिलचं पोस्ट... हेच सैराट सिनेमात उतरलं आहे. नागराज ने पिटातल्या प्रेक्षकांचही ऐकलंय आणि स्व:तचही सांगितलं आहे. सिनेमा बनविण्याची व पाहण्याची कला ढोबळ पध्दतीने दोन प्रकारात विभागला गेली, कर्मशिअल आणि आर्ट. नंतर बर्याच कालावधी पर्यंत प्रेक्षकही ह्या अलिखित पध्दतित विभागले गेले. सैराट ने सर्व बांध मोडीत काढत कर्मशिअल आणि आर्ट एकत्र आणलय बघुया सर्वांना आवडतय का... जर हे खरचं सैराट चाललं तर येणार्‍या दिवसांत सिनेमा आणखी सशक्त होईल. फर्स्ट हाफ... एव्हडा सुंदर आहे कि विचारता सोय नाही. हिन्दी सिनेमावाले निर्सगाचं मनोवेधक रुप शोधायला पार स्विजरलैंडला जायचे... पण सैराट तर हॉलिवूडवाली दृष्य मराठीत आणि ते ही महाराष्ट्रातील गाव-खेड्यांतील वेडं लावणारी दृष्य आपल्यासमोर घेऊन येतो. एकाच सिनेमात किती सुंदर गोष्टींचा म...