मुख्य सामग्रीवर वगळा

Fandry फँड्री

फँड्री

सिनेमा खूपच छान आहे अजूनही पाहिला नसेल तर हे वाचण्यापूर्वीच पाहून या! फँड्री ... जाहिरात पाहिली ती "टाईमपास" मध्ये.. एक लव्हस्टोरी समोर पडद्यावर चालू होतीच अजून एक येणार हेच प्रथमदर्शी जाणवलं.
नंतर जेव्हा सहजच नागराज मंजुळेंच्या फेसबुक वॉल वर डोकावलं... तेथेही काहीजण त्याच कुतुहलाने गेले होते कि फँड्री ह्या शब्दांचा अर्थ काय? कदाचित नागराजला हे माहित असावं... त्यांनी लिहून ठेवलं होतं, आपण फँड्री म्हणजे काय हे शोधत याल तेव्हा आपल्याला या उपेक्षित-दुर्लक्षित माणसांच्या अस्तिवाची, त्यांच्या वेदनांची जाणीव झाली तर "फँड्री" चा तुमचा शोध व मी बाळगलेले गुपित दोन्हीही फलद्रूप झाले असे म्हणता येईल.
हे वाचूनच जाणवलं की ही फक्त लव्हस्टोरी नक्कीच नसेल. पुढे सिनेमा पाहिल्यावर वरील वाक्याचे सार गवसले.

सिनेमा जब्याची कथा घेऊन येतो. त्यांच घर, कुटुंब, मित्र, प्रेमप्रकरण नि मुख्य म्हणजे गाव (समाज). हो हा समाजच मुख्य भुमिकेत आहे. अल्लड वयात असणार्‍या जब्याला एक मुलगी आवडते. तिला आपण आवडणारच नाही ह्या भितीने चंक्याच्या नादी लागून ह्याचे भलतेच(अयोग्य) उपद्द्व्याप चालू असतात. त्याच बरोबर अधिक चांगले दिसण्यासाठी, नव्या कपड्यांसाठी (योग्य) परिश्रमही सुरु होतात. जब्याचे वडिल कचरु... त्यांना संसाराचं रहाटगाडं चालू ठेवताना नाकी नऊ आलेत. एक विवाहित असून घरी नि दुसरीच्या लग्नाचा, हुंड्याचा खर्च नि त्या ओ़झ्याखाली हा माणूस अजूनच धावतोय. गावाचं आपलं वेगळंच... जत्रा आली आहे. गावकर्‍यांची, पाटलांची लगबग... ह्या सगळ्यांच कोलाज आहे हा सिनेमा. त्यात ही कुणाची लगबग, कुणाचं धावणं, कुणाची तरलता, कुणाची बेफिकरी, नात्यांची गुंफण सर्व पदर व्यवस्थित उलगडतात.

अभिनयात काय सर्वच शेरास सव्वा शेर. किशोर कदम ज्या पद्धतीने गावात, घरात, कामात वावरतो केवळ अप्रतीम. जब्याच्या भुमिकेत सोमनाथ निव्वळ जब्याचं बनून राहतो. मला आवडलेला एक सीन, जब्याला त्याचे वडील ओरडतात ह्याच्यं घाबर्‍या आवाजात उत्तर देणं... वडील पुढे निघून जाताच दात काढणार्‍या बहिणीला ह्याचं उत्तर देतानाची टोन किती तफावत... सरकन बदलणारे भाव... अभिनेत्याची समज नि दिग्दर्शकांची बारकावे पेरण्याची नि ते व्यवस्थित कॅमेर्‍यात टिपण्याची कसब. संपूर्ण सिनेमा ह्या जुगलबंदीने व्यापून राहतो.

मराठी दिग्दर्शकांचा उत्कर्षबिंदू नागराज एका नव्या उंचीवर घेऊन गेला आहे. मंगेश हाडवळेच्या "टिंग्या"त राहिलेल्या उणिवा, जसे गर्दीचे सीन, कॉश्च्युम डिझाइनिंग, कॅमेरा इ. कदाचित बजेटची कमतरता, पण उत्तम बजेट मध्ये बनलेल्या "देऊळ" मध्येही तांत्रिक उणिवा बर्‍याच होत्या, जसे एका सीन मध्ये गिरीश कुलकर्णी गायीशी बोलतोय तेव्हा गाय जागेवर थांबावी म्हणून चर्‍हाटाने बांधली असणार नंतर ते चर्‍हाट (दोर) एडिटींग मध्ये उडविला जाऊनही दिसत राहतो. इथे मात्र गायीच्या लाख पटीने चंचल चिमणी कॅमेर्‍यात व्यवस्थित कैद होते, जत्रा अगदी खरी वाटते. पाठलाग दृष्यांमध्ये कॅमेरा खर्‍याखुर्‍या गावात फिरतो. डुक्कर पकड्याचं दृष्य... कुठेही बाळबोध पणा नाही. सर्व अस्स्लं, तांत्रिक बाजु संभाळतानाच पात्रांचे नाजुक हाव-भाव सुद्धा छान टिपले आहेत.

पात्र योजना तीही अप्रतिम. आजही बर्‍याचशा गावात आढळणारे एकेक नमुने अगदी जसेच्या तसे आपल्या समोर येतात, पाटील, त्यांचा मोबाईल घेऊन शाळेत जाणारा मुलगा, त्याच्याहून वयाने मोठे असणारे त्याचे मित्र, न्हावी, लग्न जमवणारे एजंट, आणि हो चंक्या (स्वतः नागराजने साकारलेली व्यक्तिरेखा). सर्व अस्स्लं,

मुळ मुद्दा : आपल्याला फॉम्युल्याची सवय कधी लागली ते शोधावं लागेल. जसं १२ गुणिले ९ करतानाचा त्रास कमी व्हावा म्हणून कोणी पाढे बनविले, आता ते आपण पाठ केले कि कसं सगळं सोपं होऊन जातं. प्रेम दाखविण्याचा फॉम्युला, सामाजिक संघर्ष दाखविण्याचा फॉम्युला, विनोदी, थरारपट, सगळं एका फॉम्युल्यात बंधिस्त होऊन दाखवलं गेलं आजवर. जातीवाद एखाद्या प्रेमकथेतून मांडला गेला तो ही एकाच फॉम्युल्यात. दोघांच प्रेम असतं, भिन्न जाती मुळे दोघांना होणारा त्रास, घरच्यांच आकांडताडंव, गोड शेवट. फॉम्युला साल्ला.
अरे इथे तो अजून तीच्याशी बोललाही नाही (तरी ही प्रेमकथा), त्याला कोणी चाबकाने फोडून काढले नाही(तरी हा सामाजिक अन्याय) सगळं जाणवतं, अस्वस्थ करतं... वेगळं रसायनं समोर मांडतो, नागराज मंजुळे.

सिनेमा बनवनं ही कला आहे, कलाकाराचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. भारी वाक्य, पण पुस्तकांत ठिक मानून वाटचाल करणार्‍या इंड्स्ट्रीला धक्का बसतो असं काही मध्येच आलं का! खाकी सिनेमात अमिताभ एका पोलीसाला धिक्कारतो पैसा ही कमाना था तो ये खाकी क्युं पहनी. तसं निर्मात्यांचा विचार करून कलाकार (की कारकून) म्हनून वावरणारी ही फिल्म इंड्स्ट्री!!!

आणि हो पाकिस्तान, मुसलमान, ख्रिचन नि ख्रिचनर्‍यांनी "आपला" धर्म कसा नि काय काय करुन भष्ट्र केला आहे, आपला किती छळ केला आहे, त्यांच्या विरुद्ध एकजूट होण्याच्या...फुकाच्या गप्पा मारणार्‍यांना ऐक जोरात दगड मारला आहे सिनेमाच्या शेवटी. बुडा खालचा अंधार पहा अगोदर... इंटरनैशनल नंतर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

परजीवी असुरन #parasite #asuran

एकाच आठवडयात दोन वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पहिले. दोन्ही त्या त्या मूळ भाषेतच उपलब्ध आहेत. डब करून डबा झाले नाहीत, हि जमेची बाजू. मुळात भाषेचा तितकासा अडथळा जाणवतच नाही. पहिला असुरन आणि दुसरा पॅरासाईट. एकाच वैश्र्विक पातळीवर वारेमाप कौतुक तर दुसऱ्याच मात्र राष्ट्रीय पातळीवरही तितकंसं कौतुक नाही. तिळमात्र उणीवांसह दोन्ही चित्रपट म्हणून खूप समृद्ध अनुभव देऊन जातात. दोन्ही सिनेमांच्या मुख्य कथेचे बाह्यरंग निश्चितच वेगळे वाटू शकतात पण अंतरंगात शिरल्यावर मात्र अनेक साम्यस्थळं खुणावू लागतात. एक कथा शहरात घडते (#पॅरासाईट) तर दुसरी कथा गावात (#असुरन). एका कथेचा कालखंड अगदी थोडका काही महिने ते उणेपुरे एक वर्ष . दुसऱ्या कथेचा कालखंड हा जवळजवळ दोन पिढयांचा. एका कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला पिझ्झा बॉक्स (प्रिन्टिंग, कोरिगेशन नि व्यवस्थित क्रिझीग केलेला) फक्त फोल्ड करण्यासाठी #youtube ची नितांत आवश्यकता भासते, दुसऱ्या कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला बाँम्ब बनविण्यातही तितकीशी अडचण येत नाही. नायकाचं नायकपण सिद्ध करणं हि स्थानिक गरज असुरन ला वाटते ती मात्र पॅरासा

Tanu Weds Manu Return

तनु वेड्स मनु रिटर्न सध्या जुनंच भांडवल वापरुन नव्याने नफा कमविण्याचा उद्योग चालू आहे. "सेकडं पार्ट" हा हॉलीवूडचा यशस्वी फॉर्म्युला हिन्दी फिल्म इंडस्ट्रीचा नवा ट्रेन्ड आहे. हिन्दीत म्हण आहे "सब्र का फल मीठा होता है." त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे "सेकडं पार्ट"च्या नावाने अनेकानेक अत्याचार सहन केल्यावर रसिक प्रेक्षकांना एक उत्तम कलाविष्कार पहायला मिळाला तो म्हणजे तनु वेड्स मनु रिटर्न. "सेकडं पार्ट"ची जमेची बाजू १) -  ब्रॅन्ड सेट झालेला असतो, नव्याने मार्केटींग करण्याची कसरत तुलनेने थोडी कमी करावी लागते. फिल्ममेकर्स ह्या गोष्टीचा पुरेपुर फायदा घेत, थातुरमातुर मुलामा चढवलेली जुनीच गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचे उद्योग करताना सध्या दिसून येत आहेत. "सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २)  - सिनेमा हे कथा सांगण्याच एक माध्यम आहे, ज्यात प्रात्र उभी करावी लागतात त्यांच कथेतील वागणं जस्टीफाय होण्याकरता त्या पात्राचे स्वभावविषेश, पार्श्वभूमी ह्यात सिनेमाचा जो वेळ जातो नेमका तोच वेळ ह्या"सेकडं पार्ट" मध्ये शिल्लकीत असतो. त्याचा फायदा