मुख्य सामग्रीवर वगळा

सैराट... Sairat

हलका आहार... नि  जड आहार... सैराट पचायला थोडा जड गेला... जवळ-जवळ चार-एक दिवस गेले.

दो दो शक़्लें दिखती हैं इस बहके से आईने में
मेरे साथ चला आया है आपका इक सौदाई भी

ख़ामोशी का हासिल भी इक लम्बी सी ख़ामोशी है
उन की बात सुनी भी हमने अपनी बात सुनाई भी...

हे नागराजंच १४ एप्रिलचं पोस्ट... हेच सैराट सिनेमात उतरलं आहे.

नागराज ने पिटातल्या प्रेक्षकांचही ऐकलंय आणि स्व:तचही सांगितलं आहे.



सिनेमा बनविण्याची व पाहण्याची कला ढोबळ पध्दतीने दोन प्रकारात विभागला गेली, कर्मशिअल आणि आर्ट. नंतर बर्याच कालावधी पर्यंत प्रेक्षकही ह्या अलिखित पध्दतित विभागले गेले. सैराट ने सर्व बांध मोडीत काढत कर्मशिअल आणि आर्ट एकत्र आणलय बघुया सर्वांना आवडतय का... जर हे खरचं सैराट चाललं तर येणार्‍या दिवसांत सिनेमा आणखी सशक्त होईल.

फर्स्ट हाफ... एव्हडा सुंदर आहे कि विचारता सोय नाही. हिन्दी सिनेमावाले निर्सगाचं मनोवेधक रुप शोधायला पार स्विजरलैंडला जायचे... पण सैराट तर हॉलिवूडवाली दृष्य मराठीत आणि ते ही महाराष्ट्रातील गाव-खेड्यांतील वेडं लावणारी दृष्य आपल्यासमोर घेऊन येतो. एकाच सिनेमात किती सुंदर गोष्टींचा मिलाफ व्हावा... सुंदर सिनेमॅटोग्राफी... सुंदर वेश-भूषा... तितकाच सुंदर आभिनय तोही अगदी सर्वांचा... प्रेमाच्या सुंदर कल्पना... हे सारं बघताना रममाण झालेला प्रेक्षक सेंकड हाफ मध्ये भानावर येतो... वास्तवाच्या झळा मनाला दाह देऊ लगतात... शेवट धारदार नि टोकदार अगदी भाल्यासारखा...

पिक्च्र्र संपल्यावर पहिला विचार मनात आला होता खरंच गरज होती का असा शेवट दाखविण्याची... पण आता वाटतयं शेवट त्या पद्धतीने होणं गरजेचं असावं त्यामुळे का होईना बर्‍याच लव्ह्स्टोरीज् अंधारातून लख्ख प्रकाशात आल्या.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Khwada ख्वाडा

आज पर्यंत असंख्य सिनेमातून समोर दिसलेली गोष्ट, एक कुटुंब... खत्रुड बाप, कष्टमय आई, भाऊ.. वहिनी.. त्यात एक हिरो त्याचं लग्नाचं वय, त्यात एक हिरोईन, रोमान्टिक स्वप्न. जर हेच सगळं आहे तर हा सिनेमा एवढा गौरवला का गेला? भारतीय सिनेमाची सुरुवातच मुळी परीकथाचं चलचित्र रुप म्हणून झाली. मनोरंजनाचं साधनं म्हणून ते योग्यच होतं. पुढे हे केवळ मनोरंजनाचं साधन न राहता एक समाजमाध्यम म्हणून नावारुपाला आलं, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब,  गुंड, सदगृहस्थ, शहरी, ग्रामीण, त्यात समाजातील सर्वांचीच योग्य दखल घेण्याचा प्रयत्न झाला. तो प्रशंसनीय असला तरीही अपूर्ण होता कारण त्यात त्रयस्थाच्या दृष्टीने आपण ती कहानी पहाणं होत होतं. थोडक्यात एका स्त्रीच्या प्रसुती-कळांच्या वेदना पुरुषाने शब्दबद्ध कराव्यात. भाऊराव कर्‍हाडे दिग्दर्शित ख्वाडा बघताना हे क्षणोक्षणी जाणवतं... सर्वकाही किती अस्सलं आहे. असं राकट, गावरान ह्या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा भाऊराव त्याच मातीतला असणं हे महत्वाचं... तरीही ख्वाडा फक्त त्याच मातीतल्या प्रेक्षकांना भावतो असं मात्र नाही स्टोरीचा प्लॉटच वैश्विक आहे. ख्वाडाला सर्वांना...

Fandry फँड्री

फँड्री सिनेमा खूपच छान आहे अजूनही पाहिला नसेल तर हे वाचण्यापूर्वीच पाहून या! फँड्री ... जाहिरात पाहिली ती "टाईमपास" मध्ये.. एक लव्हस्टोरी समोर पडद्यावर चालू होतीच अजून एक येणार हेच प्रथमदर्शी जाणवलं. नंतर जेव्हा सहजच नागराज मंजुळेंच्या फेसबुक वॉल वर डोकावलं... तेथेही काहीजण त्याच कुतुहलाने गेले होते कि फँड्री ह्या शब्दांचा अर्थ काय? कदाचित नागराजला हे माहित असावं... त्यांनी लिहून ठेवलं होतं, आपण फँड्री म्हणजे काय हे शोधत याल तेव्हा आपल्याला या उपेक्षित-दुर्लक्षित माणसांच्या अस्तिवाची, त्यांच्या वेदनांची जाणीव झाली तर "फँड्री" चा तुमचा शोध व मी बाळगलेले गुपित दोन्हीही फलद्रूप झाले असे म्हणता येईल. हे वाचूनच जाणवलं की ही फक्त लव्हस्टोरी नक्कीच नसेल. पुढे सिनेमा पाहिल्यावर वरील वाक्याचे सार गवसले. सिनेमा जब्याची कथा घेऊन येतो. त्यांच घर, कुटुंब, मित्र, प्रेमप्रकरण नि मुख्य म्हणजे गाव (समाज). हो हा समाजच मुख्य भुमिकेत आहे. अल्लड वयात असणार्‍या जब्याला एक मुलगी आवडते. तिला आपण आवडणारच नाही ह्या भितीने चंक्याच्या नादी लागून ह्याचे भलतेच(अयोग्य) उपद्द्व्याप चालू...