एकाच आठवडयात दोन वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पहिले. दोन्ही त्या त्या मूळ भाषेतच उपलब्ध आहेत. डब करून डबा झाले नाहीत, हि जमेची बाजू. मुळात भाषेचा तितकासा अडथळा जाणवतच नाही. पहिला असुरन आणि दुसरा पॅरासाईट. एकाच वैश्र्विक पातळीवर वारेमाप कौतुक तर दुसऱ्याच मात्र राष्ट्रीय पातळीवरही तितकंसं कौतुक नाही. तिळमात्र उणीवांसह दोन्ही चित्रपट म्हणून खूप समृद्ध अनुभव देऊन जातात. दोन्ही सिनेमांच्या मुख्य कथेचे बाह्यरंग निश्चितच वेगळे वाटू शकतात पण अंतरंगात शिरल्यावर मात्र अनेक साम्यस्थळं खुणावू लागतात. एक कथा शहरात घडते (#पॅरासाईट) तर दुसरी कथा गावात (#असुरन). एका कथेचा कालखंड अगदी थोडका काही महिने ते उणेपुरे एक वर्ष . दुसऱ्या कथेचा कालखंड हा जवळजवळ दोन पिढयांचा. एका कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला पिझ्झा बॉक्स (प्रिन्टिंग, कोरिगेशन नि व्यवस्थित क्रिझीग केलेला) फक्त फोल्ड करण्यासाठी #youtube ची नितांत आवश्यकता भासते, दुसऱ्या कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला बाँम्ब बनविण्यातही तितकीशी अडचण येत नाही. नायकाचं नायकपण सिद्ध करणं हि स्थानिक गरज असुरन ला वाटते ती मात्र पॅरासा...
हलका आहार... नि जड आहार... सैराट पचायला थोडा जड गेला... जवळ-जवळ चार-एक दिवस गेले. दो दो शक़्लें दिखती हैं इस बहके से आईने में मेरे साथ चला आया है आपका इक सौदाई भी ख़ामोशी का हासिल भी इक लम्बी सी ख़ामोशी है उन की बात सुनी भी हमने अपनी बात सुनाई भी... हे नागराजंच १४ एप्रिलचं पोस्ट... हेच सैराट सिनेमात उतरलं आहे. नागराज ने पिटातल्या प्रेक्षकांचही ऐकलंय आणि स्व:तचही सांगितलं आहे. सिनेमा बनविण्याची व पाहण्याची कला ढोबळ पध्दतीने दोन प्रकारात विभागला गेली, कर्मशिअल आणि आर्ट. नंतर बर्याच कालावधी पर्यंत प्रेक्षकही ह्या अलिखित पध्दतित विभागले गेले. सैराट ने सर्व बांध मोडीत काढत कर्मशिअल आणि आर्ट एकत्र आणलय बघुया सर्वांना आवडतय का... जर हे खरचं सैराट चाललं तर येणार्या दिवसांत सिनेमा आणखी सशक्त होईल. फर्स्ट हाफ... एव्हडा सुंदर आहे कि विचारता सोय नाही. हिन्दी सिनेमावाले निर्सगाचं मनोवेधक रुप शोधायला पार स्विजरलैंडला जायचे... पण सैराट तर हॉलिवूडवाली दृष्य मराठीत आणि ते ही महाराष्ट्रातील गाव-खेड्यांतील वेडं लावणारी दृष्य आपल्यासमोर घेऊन येतो. एकाच सिनेमात किती सुंदर गोष्टींचा म...