हलका आहार... नि जड आहार... सैराट पचायला थोडा जड गेला... जवळ-जवळ चार-एक दिवस गेले. दो दो शक़्लें दिखती हैं इस बहके से आईने में मेरे साथ चला आया है आपका इक सौदाई भी ख़ामोशी का हासिल भी इक लम्बी सी ख़ामोशी है उन की बात सुनी भी हमने अपनी बात सुनाई भी... हे नागराजंच १४ एप्रिलचं पोस्ट... हेच सैराट सिनेमात उतरलं आहे. नागराज ने पिटातल्या प्रेक्षकांचही ऐकलंय आणि स्व:तचही सांगितलं आहे. सिनेमा बनविण्याची व पाहण्याची कला ढोबळ पध्दतीने दोन प्रकारात विभागला गेली, कर्मशिअल आणि आर्ट. नंतर बर्याच कालावधी पर्यंत प्रेक्षकही ह्या अलिखित पध्दतित विभागले गेले. सैराट ने सर्व बांध मोडीत काढत कर्मशिअल आणि आर्ट एकत्र आणलय बघुया सर्वांना आवडतय का... जर हे खरचं सैराट चाललं तर येणार्या दिवसांत सिनेमा आणखी सशक्त होईल. फर्स्ट हाफ... एव्हडा सुंदर आहे कि विचारता सोय नाही. हिन्दी सिनेमावाले निर्सगाचं मनोवेधक रुप शोधायला पार स्विजरलैंडला जायचे... पण सैराट तर हॉलिवूडवाली दृष्य मराठीत आणि ते ही महाराष्ट्रातील गाव-खेड्यांतील वेडं लावणारी दृष्य आपल्यासमोर घेऊन येतो. एकाच सिनेमात किती सुंदर गोष्टींचा मिलाफ
फक्त मराठीच नाही तर इतर भारतीय भाषा आणि एकंदरीत ग्लोबल सिनेमाचा लोकल भाषेत रसास्वाद !!!